Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

शिर्डी येथील श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात MHT-CET क्रॅश कोर्स सुरू!

शिर्डी( प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचालित श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी येथे MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या क्रॅश कोर्समध्ये आत्मा मलिक शैक्षणिक संकुल येथील तज्ज्ञ प्राध्यापक आणि विषय विशेषज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः MHT-CET परीक्षेकरीता महत्त्वाचे असणा-या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांवर भर देण्यात येणार आहे.


सदर कोर्ससाठी विद्यार्थ्यांकडून ५०% शुल्क आकारले जाणार असून उर्वरित ५०% शुल्क श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थे मार्फत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

या
कोर्सची वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांद्वारे सखोल मार्गदर्शन
परीक्षेच्या स्वरूपानुसार टेस्ट सिरीज आणि मोफत अभ्यास साहित्य, स्मार्ट क्लासरूम आणि ऑनलाइन सुविधा, अल्प शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण,
व्यवस्थित अभ्यासक्रम आणि वेळापत्रक राहणार आहे.


साई”संस्थानचे उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”

असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

तसेच या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेत उत्तम गुण मिळवून भविष्य घडवण्याची संधी मिळेल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button