Letest News
साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग "साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने" मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : अविनाश सनस कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री
Blog

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने  काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. 

DN SPORTS

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर  राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले.

kamlakar

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस  महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा व आरती करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार  राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. 

यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी साई मंदिराची पाहणी करून मंदिरात उपस्थित भाविकांना अभिवादन केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button