Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
क्राईमशिर्डी

शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला

पानमाळा परिसर हादरला; लोखंडी रॉड आणि चाकू घेऊन आलेल्या टोळीचा धुमाकूळ
साईनगरी शिर्डीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भरदिवसा एका दुकानदारावर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याने शहरात भीतीचे सावट पसरले आहे. पानमाळा परिसरात दुपारच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत विकास जयसवाल याच्यावर लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली, तर चाकूने गळा चिरण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“धक्का देऊन खाली पाडलं अन् थेट डोक्यावर वार”मिळालेल्या माहितीनुसार, विकास जयसवाल हा नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना अचानक स्कुटीवरून आलेल्या तिघांनी त्याला लक्ष्य केले. सुरुवातीला आरोपींनी जोराचा धक्का देत त्याला रस्त्यावर पाडले आणि त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर व शरीरावर सपासप वार सुरू केले. परिसरातील नागरिक काही समजून घेण्याच्या आतच आरोपींनी चाकू काढून त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. भररस्त्यात सुरू असलेल्या या रक्तरंजित थरारामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली.


महिलेच्या धाडसामुळे टळली मोठी दुर्घटना
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने जीवाची पर्वा न करता आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेत आरडाओरड केली. अचानक झालेल्या या प्रतिकारामुळे हल्लेखोर गोंधळले आणि तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ जखमी विकास जयसवाल याला साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


शिर्डीत गुन्हेगारांचा वाढता हैदोस; पोलिसांसमोर मोठे आव्हान
या घटनेनंतर शिर्डी शहरात संतापाची लाट उसळली असून “भरदिवसा दुकानदार सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांनी जगायचं कसं?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, पूर्ववैमनस्य होते का, की यामागे मोठा कट आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र साईनगरीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button