Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा

शिर्डी : शहरातील डी मार्ट मॉलमध्ये काम करणाऱ्या युवकाच्या कथित धर्मांतर प्रकरणामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली असून, या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरण हे मागील काही वर्षांपासून  सुरू असल्याची चर्चा असून, नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगितले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सोशल मीडिया स्टेटस ठरले संशयाचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाच्या वडिलांनी ( रवी सोनवणेच्या)  मुलाच्या मोबाईलवरील सोशल मीडिया स्टेटस पाहिले असता त्यांना संशय आला. स्टेटसमध्ये मुलगा वेगळ्या धार्मिक स्वरूपात दिसत असल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर कुटुंबीयांनी स्वतःच्या स्तरावर चौकशी सुरू केली.


कुटुंबीयांचा गंभीर आरोप; दबावाखाली धर्मांतर केल्याचा दावा
चौकशीदरम्यान, युवकाने धर्मांतर केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. तसेच, काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रभाव टाकून किंवा दबाव आणून हा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, युवक-युवतींचा एक गट अशा प्रकारे इतर युवकांशी संपर्क साधतो, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
स्थानिकांचा हस्तक्षेप; मॉलमध्ये जाऊन चौकशी
प्रकरणाची माहिती स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका व्यक्तींला  ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी पोलीस किंवा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.


पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नाही;
इतक्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही संबंधित प्रकरणात अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, “प्रकरण दडपले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
कायद्याच्या चौकटीत चौकशीची मागणी


स्थानिक नागरिक व विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. जर कोणत्याही प्रकारे बळजबरी, फसवणूक किंवा दबाव टाकून धर्मांतर घडवून आणले असेल, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहिती नुसार ज्याचे धर्मांतर झालेले आहे त्यानेच शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊनही गुन्हा दाखल केला नसल्याने मोठे पेच निर्माण झालेले आहे त्यावर कोणाचे दबाव आहे का त्याला कोणी धमकी दिलेली आहे का याचा सखोल तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे कारण कि शिर्डी हि साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे येथे सबका मालिक एक हा संदेश स्वता साईबाबांनी दिलेला आहे येथे कुठल्याही प्रकारचे जातीयताणावं निर्माण होऊ नये याची दक्षता पोलिसांनी घेऊन सत्य जाणते समोर आणण्याची गरज निर्माण झालेली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button