Letest News
शिर्डीत पुन्हा गुन्हेगारीचा सुळसुळाट – दोन दिवसातच शांततेला धक्का-निवडणूक शांततेत पार पाडणाऱ्या पोलि... शिर्डीत दत्तजयंती उत्सवाची भक्तिमय रोषणाई – फुलांच्या दिव्य सजावटीने भाविक मंत्रमुग्ध जुगारी पाटणीसह पाच जुगार्‍यांना शिर्डी पोलिसांनी चक्क जंगलातून पकडले -लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्... उत्स्फूर्त मतदानासाठी सतीश गोंदकर यांची जनतेप्रति मनःपूर्वक कृतज्ञता आपल्या योगदानामुळेच निवडणूक यशस... शिर्डीत उद्या श्री दत्त जयंतीचा महासोहळा भक्तांसाठी विशेष कार्यक्रमांची मेजवानी दत्त जयंती 2025 : रथ... रेणुका ट्रॅव्हल्सचा उघड भांडाफोड – प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मालकावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा द... शिर्डी मतदानाचा जल्लोष! नवरदेवाचं ‘डोळ्यात भरलेलं’ मतदान सर्वांच्या चर्चेत-शेरवानीतला नवरदेव मतदानाल... “मंत्रालयात पीएन कार्यक्रम करतो, आयोग फक्त स्टँप मारतो!” – थोरातांची टीका तुफान मतमोजणी पुढे ढकलली… ... आता २१ डिसेंबरला ‘ड्राय डे’ मतमोजणी पुढे ढकलल्याने जिल्हाधिकारींचा नवीन आदेश लागू शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर-खोटे मतदान उघड! प्रशासनाची तातडीची कारवाई
क्राईमशिर्डी

साईबाबांवर आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम न्यायालयात हजर — चूक मान्य करत साईबाबांचे दर्शन

राहाता (प्रतिनिधी) –
श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानविषयी समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले की, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे गैरसमज आता पूर्णपणे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत किंवा भाष्य करणार नाही.”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔹 संस्थानकडून दाखल कायदेशीर दावा

सन 2023 मध्ये साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेने राहाता न्यायालयात अशा वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर दावा दाखल केला होता. त्यामध्ये अजय गौतम यांचा समावेश होता.
सदर प्रक्रियेत दीर्घकालीन समन्वयानंतर आणि प्रत्यक्ष संवादातून त्यांचे गैरसमज दूर झाले असल्याने त्यांनी आज न्यायालयात लेखी स्वरूपात आपली चूक मान्य केली.


🔹 साईबाबांचे दर्शन घेऊन व्यक्त केला खेद

न्यायालयीन निवेदनानंतर अजय गौतम यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी उपस्थित राहून दर्शन घेतले. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, “माझ्याकडून पूर्वी जे वक्तव्य झाले ते अपुऱ्या माहितीतून झाले. आता मी साईबाबांच्या प्रचार–प्रसारासाठी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे.”


🔹 संस्थानचा सकारात्मक प्रतिसाद — गैरसमज दूर करण्याचे आवाहन

या सकारात्मक बदलाचे स्वागत करत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, “ज्यांच्या मनात अजूनही साईबाबांविषयी काही गैरसमज असतील त्यांनी थेट संस्थानशी संपर्क साधावा. परंतु जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांविरुद्ध

कायदेशीर कारवाई सुरूच राहील.”
या संपूर्ण प्रक्रियेत श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त श्री मोहन जयकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.


🙏 साईभक्तांमध्ये समाधान — सद्भावनेचा विजय

या घटनेनंतर साईभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “सत्य, श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गावर पुन्हा एक मन वळले” असा भावनिक सूर भक्तांमध्ये उमटला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button