Letest News
शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका!
क्राईमशिर्डी

शिर्डीतील ‘झिंग्या’वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारागृहात रवानगी

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करून दहशतीचे साम्राज्य उभे करणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ झिंग्या सुनील शेजवळ याच्यावर अखेर कायद्याचा जबरदस्त बडगा उगारण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न, अपहरण करून खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि अश्लील कृत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश दिले असून आरोपीला थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलीस तपासात आरोपीच्या सततच्या समाजविघातक कारवायांमुळे शिर्डी आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेलाच गंभीर धोका निर्माण झाला होता. यापूर्वी प्रतिबंधक कारवाया, हद्दपारीसह विविध उपाययोजना करण्यात आल्या; मात्र त्याचा कोणताही परिणाम न झाल्याने अखेर एमपीडीएसारख्या कठोर कायद्याचा वापर करण्यात आला.
शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आरोपीविरुद्धचा सविस्तर प्रस्ताव तयार केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या शिफारशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केला आणि आरोपीला ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.


या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.
गुन्हेगारांसाठी थेट इशारा!
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा हातात घेणारे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या धडक कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. “गुन्हा कराल तर तुरुंग अटळ,” असा इशाराच या कारवाईतून देण्यात आला आहे

सदर कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर), पोलीस निरीक्षक रणजित गलांडे (शिर्डी पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक फौजदार रविंद्र पांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुयोग सुपेकर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता पवार यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button