Letest News
साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा... गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर शिर्डीचे भूमिपुत्र निस्सीम साईभक्त अन् कट्टर शिवसैनिक कमलाकर कोते यांचा आज वाढदिवस सुजय विखेंच्या शिर्डी येथील निकटवर्तीय कार्यकर्त्यावर वाळू तस्करीचा गुन्हा १५.२० लाखांचा मुद्देमाल ज...
राजकीयशिर्डी

साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भक्तिभावाने साईचरणी विविध स्वरूपात दान अर्पण करण्याची परंपरा आजही अखंड सुरू आहे. याच श्रद्धेतून पुणे येथील साईभक्त श्री. विकास ताराचंद चोपकर यांनी गुरुवारी, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ९० ग्रॅम ९७० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.
या सुवर्ण मुकुटाची अंदाजे देणगीमूल्य १२ लाख ८२ हजार ४९५ रुपये इतके आहे. अत्यंत आकर्षक नक्षीकाम असलेला हा सुवर्ण मुकुट साईभक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचे अनमोल प्रतीक ठरला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याच्या भावनेतून चोपकर यांनी केलेल्या या देणगीबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त श्री. विकास ताराचंद चोपकर यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक केले.
साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या सुवर्ण मुकुटामुळे “श्रद्धा आणि सबुरी” या साईबाबांच्या संदेशाची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, देशभरातील साईभक्तांसाठी ही देणगी भक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button