Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

शिर्डीत माजी खासदार संभाजीराजे भोसले यांचे साई दर्शन-संस्थानकडून सत्कार

शिर्डी : माजी खासदार तथा मराठा समाजाचे प्रमुख नेते संभाजीराजे भोसले यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे भावपूर्ण दर्शन घेतले. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संभाजीराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांना साईबाबांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संभाजीराजे भोसले यांची पार्श्वभूमी
संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याचे वंशज असून मराठा समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे. ते राज्यसभेचे माजी खासदार राहिले असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मोठे कार्य केले आहे. मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
इतिहासप्रेमी आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित विषयांवर ते नेहमीच ठाम भूमिका घेताना दिसतात.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button