Letest News
श्री साईचरणी १५ लाख रुपयांचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण-साईभक्ताच्या श्रद्धेला सुवर्णस्पर्श डिझेल चोरांच्या पाठीराख्यांवर कारवाई कधी? नागरिकांचा पोलीस अधीक्षकांना सवाल भीषण अपघातानंतर पोलिसांची धाव-रणजित गलांडे यांच्या पथकाने वाचवले जखमींचे प्राण बसचालक निघून गेल्याची... सावळीविहीर आठवडे बाजारात पुन्हा मोबाईल चोरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता
क्राईमशिर्डी

सावळीविहीर आठवडे बाजारात पुन्हा मोबाईल चोरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामुळे सावळीविहीर आठवडे बाजारातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारी वेणुनाथ भाऊसाहेब डांगे यांचा मोबाईल बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादीनुसार, 21 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेणुनाथ डांगे हे सावळीविहीर आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करत होते. त्यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशात असलेला पांढऱ्या रंगाचा सॅमसंग गॅलेक्सी A54 5G मोबाईल चोरीला गेला. परिसरात शोध घेऊनही मोबाईल न मिळाल्याने त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या घटनेनंतर सावळीविहीर आठवडे बाजारातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाजारात यापूर्वीही अनेक मोबाईल चोरी, पाकिटमारी तसेच महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचा वावर वाढत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, आठवडे बाजारातून विविध शुल्क आणि कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. बाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अपुरी असून कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे चोरट्यांचे फावते आहे.


बाजार परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करणे आणि गर्दीच्या दिवशी विशेष गस्त पथके तैनात करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वेळेत ठोस उपाययोजना न झाल्यास चोरीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सावळीविहीर आठवडे बाजारातील सुरक्षा व्यवस्थेबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
01


“आठवडे बाजारातून महसूल गोळा केला जातो, मग नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि नियमित देखरेख व्यवस्था का नाही?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मोबाईल चोरी, पाकिटमारी आणि दागिने चोरीच्या वाढत्या घटनांमुळे बाजारातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button