Letest News
बसस्थानकात दुचाकी चोरीचा प्रयत्न-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने कट उधळला “२८ वर्षांपासूनचा निवारा नियमित करा!” — अण्णाभाऊ साठे नगरातील ९ कुटुंबांची शासनाकडे आर्त मागणी साईबाबांच्या पवित्र भूमीत ‘तळघर घोटाळा’? “तळघरात सुरू संशयास्पद पैशांचा खेळ — भाविकांच्या श्रद्धेला ... शिर्डीत ‘ई-चलन’चा तडाखा! १०-३०२ केसेस. ८३ लाखांचा दंड वसूल- नियम मोडला की थेट दंड – वाहतूक पोलिसांचा... महामानव जयंतीनिमित्त निमगाव कोहाळेत शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा “शिर्डीत भक्तांच्या जीवाशी खेळ!” – प्रसाद भोजनालय रोडवर मृत्यूचा उघडा खड्डा कामधंद्याच्या वादातून मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या- राहता शहरात खळबळ फरार ‘भावड्या’ अखेर जाळ्यात- शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कारवाई 🔥 समता पतसंस्थेचा धक्का राज्यभर! ‘काका’ कोयटे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा – खरात कनेक्शनमुळे मोठा राजक... शिर्डीत ‘मेरी गोल्ड’वर ईडीचा महाधडाका! ११ तास बंद दरवाज्यात चौकशी – अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याच...
अ.नगरक्राईम

कामधंद्याच्या वादातून मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या- राहता शहरात खळबळ

राहता : शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कामधंदा करत नसल्याबाबत वारंवार जाब विचारल्याच्या रागातून मुलाने आपल्या ६५ वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राहता परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत उत्तम लक्ष्मण खैरे (वय ६५, रा. घोलप मंगल कार्यालयाजवळ, राहता) हे आपल्या मुलगा सचिन उत्तम खैरे याला कामधंदा करत नसल्याबद्दल नेहमी विचारणा करत होते. “काम का करत नाहीस, पैसे का कमवत नाहीस” असा जाब ते वारंवार विचारत असल्याने आरोपीच्या मनात राग साचला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोरील अंगणात या वादाने उग्र रूप धारण केले. संतापाच्या भरात आरोपी सचिन खैरे याने आपल्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जवळच असलेल्या फरशीने डोक्यावर व शरीरावर गंभीर प्रहार केले. या भीषण मारहाणीत उत्तम खैरे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राहता पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम १०३(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सचिन खैरे याला ताब्यात घेतले आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहता पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत्या करत आहेत.
दरम्यान, केवळ भविष्यासाठी काळजीपोटी कामाबाबत विचारणा करणाऱ्या वडिलांची मुलानेच हत्या केल्याने राहता शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button