Letest News
सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव...
अ.नगरक्राईम

pune news:-मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं मृत्यूचे कारण

Mobile hotspot became the cause of death

पुणे शहर काल हत्येच्या घटनांनी हादरले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर, त्याचबरोबर एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांचीदेखील अज्ञात व्यक्तीनी हत्या केली होती. या दोन घटनांनी पुणे शहर हादरले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्याचवेळी तीन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत होते. तसंच, नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना घडली होती.

त्यामुळं शहरातही एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हत्येच्या तपास करत असतानाच समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. मोबाइलचे हॉटस्पॉट न दिल्याने वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केली आहे. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र, वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button