Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर आंदोलन

लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज, मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक-आगारातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक ७ ऑगस्ट रोजी झाली. २० ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने ३ सप्टेंबरपासून होणाऱ्या आंदोलनात गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे, असे एसटी कामगार संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button