Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतीचे झाकण उडवले:- आ.बाळासाहेब थोरात

शिर्डी प्रतिनिधी/महाविकास विकास आघाडीचे शरद पवार यांचे खंदे समर्थक कार्यसम्राट निलेश लंके यांनी  निर्णायक आघाडी घेतली  आहे. भाजपचे उमेदवार विखे यांना मोठ्या फरकाने हरवून राष्ट्रवादीचा झेंडा रोवत थेट मोठ्या मताधिक्याने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचा विजय म्हणजे जनतेने दिलेली पावती असुन गणेश कारखाना नंतर नगरचा विजय हा विखेच्या दहशतीचे झाकण उडवणारा असुन राहीलेले थोडेसे झाकण देखील आपण काही महिन्यांत उडवणार असल्याचे संकेत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितल्यामुळे शिर्डी विधानसभेची निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार असल्याचे सुचित केले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


माजी खासदार सुजय विखे यांनी पराभवाचे संकेत बघताच नगर येथील मतमोजणी केंद्र दुपारीच सोडणे पसंत केले होते लंके समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण सुरु करीत जल्लोष सुरु केला आहे. सकाळी मतमोजनीला सुरुवात झाली पहिल्या फेरी पासून सुजय विखे आघाडीवर होते परंतु दुपार नंतर निलेश लंके यांनी आघाडी घेतली आणी शेवट पर्यंत आघाडी घेत मोठ्या फरकाने  सुजय विखेंचा पराभव केला राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखेंना  जोरदार झटका दिला विखेच्या प्रचारासाठी दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर येथे आले होते

त्यावेळी  निलेश लंकें म्हणाले की पंतप्रधानाना दोन वेळा यावे लागते म्हणून माझा विजय निश्चित आहे असे सांगत होते प्रस्थापित साखर सम्राट विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी रंगत माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी आणली होती व तेथेच विजय सोपा झाला होता .महाविकास आघाडीने भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून

 अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अहमदनगरचा निकाल लागताच शिर्डीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला शिर्डीत उंटावरून स्टीलच्या चमच्यांनी साखरेचं वाटप करण्यात आले

ह्यावेळी काँग्रेसचे जेष्ठनेते एकनाथराव गोंदकर, शिवसेनेचे जेष्ठनेते सुहास वहाडणे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे सचिन कोते सचिन चौघुले सुरेश आरने सुयोग् सावकारे सह शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला निवडून आलेल्या महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विजयाचा आनंद उत्साह साजरा करण्यात आला आले  

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button