Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
Blog

श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर शिवसेनेचे दोन्ही गट भिडले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) येत असतात. आदल्या दिवसापासूनच शिवतीर्थावर गर्दी जमू लागते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीदेखील काही वेळापूर्वी शिवतीर्थावर जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसेच तिथला बंदोबस्त आणि सुविधांची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यामुळे बराच वेळ तिथे तणाव निर्माण झाला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शिवतीर्थावर दाखल झालेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं. शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली. तसेच या राड्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढला आहे. परिणामी मुंबई पोलिसांचं एक पथक शिवतीर्थावर दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परबदेखील शिवतीर्थावर दाखल झाले. ठाकरे गटाच्या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. पाठोपाठ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केदेखील शिवतीर्थावर पोहोचले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button