Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
क्राईमशिर्डी

शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली

आज सायंकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास, साईदर्शन आटोपून भक्त निवासाकडे जात असलेल्या आंध्रप्रदेशातील दोन महिला साईभक्तांना चोरट्यांनी लक्ष्य केलं.
नगर-मनमाड रस्त्यावरील ५०० रूम परिसरात ही घटना घडली.
मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धुम स्टाईलने या दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्या आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
या सोन्याच्या चैनची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर दोन्ही महिला साईभक्त प्रचंड घाबरल्या आणि ढसाढसा रडू लागल्या.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन्ही महिलांना शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
चैन स्नॅचिंग करणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शिर्डी पोलीस तपास करत आहेत.
साईभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button