Letest News
बिर्याणीत गुटखा सापडला तर हॉटेल सील… मग जेवणात झुरळ सापडूनही चिन्नाराव हॉटेलला अभय का? दोन दिवसांत न... राहाता पोलिसांची वाळूचोरांवर कारवाई १५ लाखांच्या डंपरसह आरोपी ताब्यात पेढ्यांनी दिला धक्का-पॅकिंगवर विश्वास ठेवायचा तरी कसा? डीमार्टमधून घेतलेले पेढे बुरशीयुक्त शिर्डी–अहिल्यानगर रस्त्यावरून राजेंद्र पिपाडा यांचा संताप ‘जनतेने तक्रारी करायच्या नाहीत तर कोण करणा... “साईबाबांची पालखी समोर असताना कुठल्याही संकटाची भीती नाही!” — निस्सीम साईभक्त विजयभाऊ कोते साईनामाच्या जयघोषात अयोध्येत दाखल झाली साईबाबांची पालखी! दीड हजार साईभक्तांनी घेतले रामलल्लाचे दर्शन माजी मंदिर प्रमुखांची दादागिरी? शिर्डीत खळबळ- सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी- शिवीगाळ केल्याच्या आरोपावरू... काशीत दुमदुमला ‘साई नामाचा’ जयघोष!साई निर्माण ग्रुपच्या १२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रेचे बनारस ... चोरीच्या तयारीत असल्याच्या संशयावरून गणेश दिलीप खरात मुश्ताक शाह व खाटिक ह्या तिघांना पकडले वैद्यकीय बिलाची रक्कम जमा करण्यासाठी लाच घेतली सरकारी कर्मचाऱ्याला कारावासाची शिक्षा!
क्राईमशिर्डी

बिर्याणीत गुटखा सापडला तर हॉटेल सील… मग जेवणात झुरळ सापडूनही चिन्नाराव हॉटेलला अभय का? दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आमरण उपोषण!’


शिर्डी : शिर्डी शहरातील चिन्नाराव यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकाला देण्यात आलेल्या खाद्यपदार्थामध्ये झुरळ आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित हॉटेल सील करण्यात आले नसल्याने शिर्डी नगर परिषदेच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका प्रकरणात अन्नामध्ये गुटख्याची पुडी आढळल्यानंतर बिर्याणी हाऊसवर तात्काळ सीलची कारवाई करणारी नगर परिषद, झुरळ आढळल्याच्या प्रकरणात मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून थांबली का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून चिन्नाराव हॉटेलवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यक असल्यास हॉटेल तात्काळ सील करण्यात यावे, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष समीर वीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्राहकाने संबंधित हॉटेलमधील खाद्यपदार्थामध्ये झुरळ आढळल्याची अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतरही हॉटेलविरोधात केवळ सौम्य कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. खाद्यपदार्थामध्ये झुरळ आढळणे हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


एका हॉटेलसाठी सील, दुसऱ्यासाठी दंड का?
यापूर्वी शिर्डी परिसरातील एका बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणीमध्ये गुटख्याची पुडी आढळून आल्याच्या प्रकरणात शिर्डी नगर परिषदेने तात्काळ कठोर भूमिका घेत संबंधित बिर्याणी हाऊस सील केले होते. मात्र आता चिन्नाराव हॉटेलमधील खाद्यपदार्थामध्ये झुरळ आढळूनही तशीच कारवाई का करण्यात आली नाही, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
कायद्याचे नियम सर्वांसाठी समान असताना कारवाईचे निकष मात्र वेगवेगळे का? असा थेट सवाल भारतीय लहुजी सेनेने उपस्थित केला आहे.
नगर परिषद कोणत्या नियमांच्या आधारे एका व्यावसायिकाचे हॉटेल सील करते आणि दुसऱ्या प्रकरणात केवळ दंडात्मक कारवाई करून प्रकरण संपवते, याचा खुलासा नागरिकांसमोर होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.


नगर परिषद कोणाच्या दबावाखाली? निष्पक्ष चौकशीची मागणी
चिन्नाराव हॉटेलवर कठोर कारवाई करण्यात नगर परिषद टाळाटाळ करत आहे का? संबंधित हॉटेलवर कोणाचा राजकीय अथवा इतर प्रकारचा दबाव आहे का? प्रभावशाली व्यक्तींना वेगळे आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना वेगळे नियम लागू केले जात आहेत का? अशा अनेक गंभीर प्रश्नांनी आता शिर्डीतील वातावरण तापले आहे.
या सर्व प्रकरणाची जिल्हास्तरावरून निष्पक्ष चौकशी करून शिर्डी नगर परिषदेने आतापर्यंत कोणती कारवाई केली, संबंधित हॉटेलचे अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे परवाने वैध आहेत का, तसेच नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दोन दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, येत्या दोन दिवसांत या प्रकरणात नियमानुसार ठोस निर्णय घेऊन आवश्यक असल्यास संबंधित हॉटेल सील करण्याबाबत निर्णय न घेतल्यास शिर्डी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष समीर वीर यांनी दिला आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला विशेष सवलत दिली जाऊ नये. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. एका हॉटेलवर सीलची कारवाई आणि दुसऱ्या हॉटेलवर केवळ दंडात्मक कारवाई हा प्रकार नागरिकांच्या मनात संशय निर्माण करणारा आहे,” अशी भूमिका भारतीय लहुजी सेनेने मांडली आहे.


आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात हस्तक्षेप करून शिर्डी नगर परिषदेच्या कारवाईची चौकशी करणार का? की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणातही फक्त कागदी कारवाई करून वेळ मारून नेली जाणार? याकडे आता संपूर्ण शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.
शिर्डी नगर परिषदेने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक झाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button