Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरक्राईम

राहाता पोलिसांची वाळूचोरांवर कारवाई १५ लाखांच्या डंपरसह आरोपी ताब्यात

राहाता : अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीवर राहाता पोलिसांनी कारवाई करत तब्बल १५ लाख २० हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास पुणतांबा-शिर्डी जाणाऱ्या रस्त्यावरील पुणतांबा गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा आपल्या ताब्यातील टाटा कंपनीच्या ९१२ मॉडेलच्या पिवळ्या व राखाडी रंगाच्या डंपरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सदर आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे १५ लाख २० हजार रुपये किमतीचा डंपर व त्यामधील वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बर्डे हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button