Letest News
गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा
राजकीयशिर्डी

साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यांची संकल्पना

शिर्डी | प्रतिनिधी :
श्री सद्गुरू साईबाबांच्या पावन भूमीतून निघणाऱ्या साईभक्तांसाठी यंदाचा श्रावण महिना भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम घडविणारा ठरणार आहे. राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली साई निर्माण ग्रुप व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने ‘श्री साई पारायण तीर्थयात्रा–२०२६ संकल्पपूर्ती’ या भव्य तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची संकल्पना विजयराव कोते यांची असून, साईभक्तांना देशातील तसेच नेपाळमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्याचा हा धार्मिक उपक्रम आहे.
श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर श्री साईसच्चरित्र पारायण करणाऱ्या भाविकांसह साईभक्तांना काशी विश्वनाथ, अयोध्या आणि नेपाळमधील श्री पशुपतीनाथ या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


१२ ज्योतिर्लिंग दर्शनानंतर संकल्पपूर्तीचा पुढचा अध्याय
साई निर्माण ग्रुप व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसह तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता संकल्पपूर्तीच्या निमित्ताने काशी-अयोध्या-पशुपतीनाथ दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे या यात्रेला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साईबाबांच्या कृपाशीर्वादाने आणि साईभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही यात्रा अविस्मरणीय करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.


२२ बोगींची विशेष ट्रेन; १४ बोगी फुल्ल
भाविकांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण यात्रा अधिक शिस्तबद्ध व सोयीस्कर पद्धतीने पार पडावी, यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष ट्रेनमध्ये एकूण २२ बोगींचा समावेश असून आतापर्यंत तब्बल १४ बोगींचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
आता केवळ ८ बोगींचे बुकिंग शिल्लक असल्याने यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साईभक्तांनी विलंब न करता आपली नोंदणी करून जागा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


काशी-अयोध्या-पशुपतीनाथ दर्शनाचे भाग्य
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या काशी विश्वनाथाचे दर्शन, प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येतील धार्मिक स्थळांचे दर्शन तसेच नेपाळमधील जागतिक ख्यातीचे श्री पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन या यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
श्री साईसच्चरित्राच्या भक्तिमय पारायणानंतर या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार असल्याने साईभक्तांमध्ये यात्रेबाबत मोठा उत्साह निर्माण झाला आहे.


‘संकल्पपूर्ती’ यात्रेला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विजयराव कोते यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या यात्रेला साईभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साईबाबांच्या पावन भूमीतून सुरू होणारी ही यात्रा भक्ती, श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचा संदेश देणारी ठरणार आहे.
साईबाबांच्या चरणी श्रद्धा अर्पण करून काशी, अयोध्या आणि पशुपतीनाथाचे दर्शन घेण्याची ही संधी साईभक्तांनी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


उर्वरित ८ बोगींसाठी तातडीने बुकिंग करा
विशेष ट्रेनमधील बोगींची संख्या मर्यादित असल्याने इच्छुक भाविकांनी पत्रकावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर तातडीने संपर्क साधून आपले बुकिंग निश्चित करावे. १४ बोगींचे बुकिंग पूर्ण झाले असून केवळ ८ बोगी उपलब्ध असल्याने ‘आधी नोंदणी, आधी प्राधान्य’ या तत्त्वावर भाविकांनी सहभाग निश्चित करावा, असे आयोजकांनी सांगितले.
साईबाबांच्या आशीर्वादाने साकारत असलेल्या या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेत मोठ्या संख्येने साईभक्त सहभागी होऊन काशी-अयोध्या-पशुपतीनाथाचे पवित्र दर्शन घ्यावे, असे आवाहन साई निर्माण ग्रुप व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
साई निर्माण ग्रुप, शिर्डीच्या वतीने यात्रेस जाणाऱ्या सर्व साईभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button