Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
क्राईमशिर्डी

बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!

शिर्डी (प्रतिनिधी) :
राहाता येथील एका पतसंस्थेच्या शाखेत कथित बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक व्यक्तींच्या नावाने खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती तपासात पुढे आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, संबंधित शाखा व्यवस्थापक तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासादरम्यान अनेक खातेदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, काहींनी “आमच्या नावाने खाते उघडल्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती,” असा दावा केला आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे, केवायसी प्रक्रिया, स्वाक्षऱ्या, ओळखपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू आहे.
अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बोगस खाती उघडण्यामागील नेमका सूत्रधार कोण? आर्थिक व्यवहारांचा अंतिम लाभार्थी कोण? या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.


या प्रकरणात आणखी काही जणांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, तपासात नवीन धागेदोरे मिळाल्यास आणखी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता शिर्डी पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button