Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरराजकीय

सेतू केंद्र चालकांचे काम बंद आंदोलन,, लाडकी बहिणींचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून मोबदला मिळण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना विनाशुल्क अर्ज भरण्याचे आदेश दिले आहे. सेतू केंद्र चालकांना इतर खर्च असताना मोफत अर्ज भरणे परवडत नसल्याने सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालक आणि सीएससी सेंटर चालकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन करत तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन दिले आहे.

sai nirman
जाहिरात
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व CSC सेंटर चालक व ऑनलाईन महा-ई-सेवा तसेच आधार सेंटर चालक आम्ही सर्व एकमताने आज रोजी तहसिलदार यांना निवेदन देत एकदिवसीय लाक्षणिक बंद ठेवत आहोत.शासन नविन शासन निर्णय काढतोय परंतु CSC सेंटर धारकांना ते फुकट करुन घ्या असे सांगण्यात येते पण आम्ही फुकट का करुन दयावे? आम्हाला त्याचे योग्य ते

कमीशन कायम निश्चित करा व ते प्रत्येक महिन्याला VLE च्या खात्यावर जमा करा कींवा
प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये असे मानधन कायम निश्चित करा अश्या विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहे. मुख्यामंत्राची लाडकी बहिण योजनेचे कार्यच ऑन लाईन करण्यासाठी (CSC ID) लिंक ओपन करुन दयावी . अशा विविध मागण्यासाठी कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे.शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार नाही असा इशारा देखील सीएससी सेंटर चालकांनी दिला आहे.

DN SPORTS

kamlakar

दिलेल्या निवेदनावर सागर शिंदे, सतीश कदम, एकनाथ लामखडे, दीपक पानगव्हाणे, दीपक कांबळे पोपट जाधव ,ज्योती खंडझोड, संदीप शिरसाठ,राजेंद्र वाघ, रवींद्र वलटे, वैभव चव्हाण ,नितीन बोरणारे, किशोर मैंद,पंकज मोरे, ऋषिकेश जाधव, हर्षल पाचोरे ,सुरेश शिंदे दत्तात्रय गोरडे ,सागर जामदार, संतोष माळवदे ,जितेंद्र टेके, गिरीश नारंग ,आतिश गवळी आदींच्या स्वाक्षरी आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button