Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारांना तातडीचे निर्देश

शिर्डी (वार्ताहर):
शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय शिर्डी यांनी या प्रकरणात मोठी हालचाल सुरू केली आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माणिक भाऊराव आहेर यांनी तहसीलदार कार्यालय राहाता यांना दिलेल्या आदेशात लक्ष्मीनगरमधील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अर्जदार काळू सखाराम आरणे व इतर रहिवाशांनी सादर केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, लक्ष्मीनगर परिसरात सन १९७५ पासून अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. “भूमीहीन मजुरांना घरे देण्याची योजना” अंतर्गत सुमारे १०१ घरे असून, याशिवाय जवळपास २५० अतिक्रमणधारक कुटुंबे येथे राहतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सर्व कुटुंबांना शासनाच्या निर्णयानुसार मालकी हक्काचे ७/१२ उतारे मिळावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कागदपत्रांची (नगरपालिका उतारे, घरपट्टी, झोन दाखले आदी) सखोल पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सर्वांसाठी घरे २०२२ धोरण तसेच महसूल विभागाच्या २०२५ च्या शासन निर्णयानुसार, सन २०११ पूर्वीपासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना जागांचे पट्टे देण्याची तरतूद आहे. याच नियमांच्या अधीन राहून अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.


तहसीलदारांना स्थळपाहणी करून प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे लक्ष्मीनगरमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button