Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
राजकीयशिर्डी

साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद!

श्री साईबाबा संस्थानच्या दर्शन रांगेत कर्तव्य बजावत असताना प्रामाणिकतेचा प्रेरणादायी आदर्श समोर आला आहे. सुरक्षा कर्मचारी श्री रवींद्र भास्कर खरात यांना नवीन दर्शन रांगेत अंदाजे 2.450 ग्रॅम वजनाची, सुमारे ₹37,000 किंमतीची सोन्याची अंगठी सापडली. त्यांनी कोणताही मोह न बाळगता ही मौल्यवान वस्तू तत्काळ संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
तसेच, एन.एस.एस. एजन्सीचे आरोग्य कर्मचारी श्री अनिकेत शशिकांत तुपे यांनाही दर्शन रांगेत ₹2,840 रोख रक्कम सापडली. त्यांनीही प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत ही रक्कम प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दोन्ही कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे साईनगरीत ईमानदारीचा आदर्श निर्माण झाला असून भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. “साईंच्या नगरीत अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे,” अशी भावना यामुळे व्यक्त होत आहे.
सदर घटनेमुळे श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 🙏

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button