Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
अ.नगरराजकीय

नागरिकांना सतर्कतेचा इशारा मदतीसाठी प्रशासन तत्पर !

अहिल्यानगर, दि. २२ – जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

बचावकार्याची ठळक माहिती

DN SPORTS
  • अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता.
  • पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली.
  • जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले.

मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button