Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
Blog

विखे हे राज्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हतीगणेशचा पराभव अद्याप पचऊ शकले नाही- विवेक कोल्हे

कोपरगाव (प्रतिनिधी )सन
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील ५ आमदाराच्या पराभवास जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे जबाबदार असून त्यांच्या या कारस्थानी राजकारणामुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. असा सणसणाटी आरोप सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. कोल्हे यांच्या टीकेमुळे जिल्हा भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर यायला सुरवात झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दिनांक ५ डिसेंबर रोजी कोपरगाव येथे काका कोयटे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता . यावेळी विखे यांनी कोल्हे यांच्यावर मंजूर झालेली एमआयडीसी आणि गणेश कारखान्याच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर टीका करताना म्हटले होते की कोणाची कशी जिरवायची हे आम्हाला चांगले माहित आहे. कोपरगावात राहिलेला गाळ आम्ही काढू तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे हेच महायुतीचे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणण्याची हमी आपण घेत आहोत. या टीकेचा समाचार घेताना विवेक कोल्हे म्हणाले की विखे ज्यांच्या विजयाची ग्यारंटी घेतात त्यांना पराभूत करण्याचाच इतिहास आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांपुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे सांगण्याची गरज नाही.

kamlakar

मागील निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी त्यांनी आपल्या मेहुण्याना उभे केले . त्यांनी जवळपास १० हजार मते खाल्ली . त्यामुळे अवघ्या ८५० मतांनी आमचा पराभव झाला . मात्र त्याची बक्षिशी म्हणून परजणे यांना महानंदचे अध्यक्ष पद देण्यात आले. एन डी डी बी च्या संचालक पदी नेमण्यात आले. आपल्याच पक्षात राहून पक्षाचे उमेदवार पाडून पक्ष विरोधी काम ते सतत करत आले आहे. विखे यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून २०१९ च्या निवडणुकीत ५ भाजपा उमेदवारांचा पराभव केला असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी जर ५ उमेदवारानां पराभूत केले नसते तर कदाचित महाघाडीचे सरकारही आले नसते. त्याचा फटका भाजपला आणि पर्यायी राज्यालाही बसला आहे. राज्यात महायुतीची सत्ता येऊन वर्ष उलटून गेले . त्यानंतर आताच का महसूल मंत्र्यांना कोपरगाव मध्ये येण्याचे सुचावे.?

तेही हेलीकॉप्टर बीघडले तर खाजगी विमानाने ते कोपरगावमध्ये दाखल झाले . अवघ्या ५-१० कोटीच्या विकासकामाच्या उद्घाटनाच्या नावखाली येथे येऊन आमच्या सारख्या स्वपक्षाच्याच नेत्यांवर टीका करत विरोधी विरोधकांचे गुणगान करत बसले. विखे पाटील राज्याचे महसूल मंत्री आणि पक्षातील मोठे नेते आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात लक्ष घालण्याची गरज नव्हती मात्र गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतील पराभव ते अद्याप पचवू शकले नाहीत . परंतु त्या निवडणुकीचा पक्षाचा काहीही संबंध नव्हता ती एक सहकारी संस्थेतील स्थानिक पातळीवरील राजकीय लढाई होती. आणि कार्यकर्त्यांच्या आणि शेतकरी सभासादांच्या मध्ये झाली .आणि त्यात सभासद शेतकऱ्यांनी विखेंच्या दडपशाहीला झिडकारले. विखे यांच्या या कारवायांची तक्रार आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याची माहितीही कोल्हे यांनी यावेळी दिली .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button