Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
राजकीयशिर्डी

नाताळ–नववर्षात विक्रमी भाविकांची गर्दी-तरीही शिर्डीत शून्य चोरी! पोलीस–संस्थान समन्वयाचे उत्तम उदाहरण- सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गौरव

शिर्डी | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
गतवर्षी नाताळच्या सुट्ट्या तसेच नववर्ष स्वागताच्या कालावधीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे विक्रमी भाविकांची गर्दी झाली होती. या अवघ्या काही दिवसांत सुमारे ८ लाख भाविकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले, तरीही मंदिर व परिसरात एकही चोरी अथवा अनुचित घटना घडली नाही, ही बाब शिर्डीच्या प्रशासनासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


प्रचंड गर्दीतही चोख बंदोबस्त, साध्या वेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची मोलाची भूमिका
या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस स्टेशन व श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाने परस्पर समन्वय राखत अत्यंत प्रभावी बंदोबस्त व्यवस्था उभारली होती.
विशेष म्हणजे, संस्थानच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांना भाविकांच्या गर्दीत साध्या वेशात नेमण्यात आले होते, ज्यामुळे संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवता आली.


प्रामाणिक सेवा, सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेचा आदर्श
या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने व पूर्ण सतर्कतेने आपली जबाबदारी पार पाडली.
त्यांच्या चोख, दक्ष आणि शांत कामगिरीमुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही मंदिर परिसरात सुरक्षिततेचा उच्चतम दर्जा राखला गेला.


पोलीस प्रशासनाकडून गौरव; रिवॉर्ड व प्रशंसा पत्र प्रदान
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अमोल भारती व
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. रणजित गलांडे
यांनी पुढाकार घेऊन संबंधित श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देऊन प्रशंसा पत्र प्रदान केले.
यावेळी भविष्यातही अशीच उत्कृष्ट व अनुकरणीय कामगिरी अपेक्षित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


संस्थान प्रशासनाकडूनही मनःपूर्वक अभिनंदन
सदर कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे
यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


शिर्डीची सुरक्षितता : श्रद्धा, शिस्त आणि सेवाभावाचे प्रतीक
विक्रमी भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवरही शून्य गुन्हेगारीची नोंद होणे हे
👉 पोलीस, संस्थान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचे
👉 तसेच सेवा आणि कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण असल्याचे मत भाविकांतून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button