Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी

परभणी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे जाऊन पीडित सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. परभणीतील आंदोलनानंतर पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दलित समाज संतप्त झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या घटनेचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे न्यायाधीशांसमोर सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटलं होतं. आता, राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे, तसेच फडणवीस खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले.

मी आज सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली, ज्यांना मारहाण झाली त्यांचीही भेट घेतली. मला त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टंस दाखवले, व्हिडिओ दाखवले, त्यावरुन ही 100 टक्के न्यायालयीन मृत्यू आहे, पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्र्‍यांनी विधानसभेच्या सभागृहात पोलिसांना मेसेज देण्यासाठी खोटं बोललंय, असे म्हणत राहुल गांधींनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित आहेत,

ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लोकांनी हे केलंय, त्यांना शिक्षा व्हावी, अद्यापपर्यंतच्या कारवाईवर मी संतुष्ट नाही. हे कुठलंही राजकारण नाही, जिम्मेदार विचारधार आहे, मुख्यमंत्र्‍यांनी स्टेटमेंट दिलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सोमनाथ सोमवंशी यांना दम्याची बिमारी होती आणि त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. पण, मुख्यमंत्री खोटं बोलले आहेत, विधानसभेची त्यांनी दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री यांच्यावर आम्ही प्रिविलेज मोशन आणू, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले.

इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडतील आणि सरकारचं पितळ उघड करतील. ज्या पद्धतीने ठरवून मागासवर्गीयांना आणि बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचं काम बीजेपी करत आहे, ते या ठिकाणी दिसलं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button