Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीयशिर्डी

शिर्डीचे भूमिपुत्र-गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर प्रशांत गोंदकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीचे भूमिपुत्र, गोरगरिबांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर प्रशांत गोंदकर यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणा व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिर्डी नगर परिषदेचे नूतन नगरसेवक नंदूभाऊ (सतीश उर्फ नंदू) गोंदकर मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर संतोष गोंदकर यांचा शाल व श्रीफल देऊन सन्मान करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

डॉक्टर प्रशांत गोंदकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी व परिसरातील सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा देत असून मानवतेच्या भावनेतून उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना माफक दरात किंवा विनामूल्य उपचार देत त्यांनी समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.


या सन्मानप्रसंगी नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“डॉक्टर प्रशांत गोंदकर हे केवळ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर नसून ते समाजाचे खरे सेवक आहेत. गोरगरिबांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तीचा सन्मान होणे ही शिर्डीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.”


कार्यक्रमास समाजसेवक नितीन तात्या गोंदकर, रमेश गोंदकर साई तनपुरे संतोष शेजवळ दिनेश गुजर सदाभाऊ शेळके ओम प्रकाश श्रीवास्तव रवि चौधरी सुनील गोंदकर माजी नगरसेवक अशोक गायके यांच्यासह शिर्डी परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टर संतोष गोंदकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व वैद्यकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


डॉक्टर प्रशांत गोंदकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितले की,
“शिर्डी ही माझी जन्मभूमी आहे. येथील लोकांचे ऋण मी कधीही विसरणार नाही. गोरगरिबांची सेवा करणे हाच माझा खरा वाढदिवसाचा आनंद आहे.”


हा वाढदिवस कार्यक्रम दिमाखदार उत्सवाऐवजी सामाजिक ऋणाची जाणीव करून देणारा ठरला. शिर्डीच्या सामाजिक जीवनात योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान होणे ही नक्कीच प्रेरणादायी बाब असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button