Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरक्राईम

इराणी गल्लीतील कारवाईला हिंसक वळण आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाचा हल्ला

श्रीरामपूर (प्रतिनिधी):
शहरातील इराणी गल्ली परिसरात आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या तपास पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ७ जानेवारी २०२६) दुपारी घडली. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिस उपनिरीक्षकांनी हवेत एक गोळी झाडली.
पाहिजे आरोपीला अटक करताना गोंधळ
जमावाकडून दगडफेक व पोलिसांशी झटापट
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक २९ (बीएनएस ३१९(२), ३(५)) मधील पाहिजे आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली नं. १, श्रीरामपूर) याचा शोध घेण्यासाठी तपास पथक शहरात दाखल झाले होते.
या पथकात पोलीस हवालदार विलास सरजिने, विलास सरोजने, तपास पथक प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोहेका संतोष जाधव, पोका किरण मदने, महिला पोलीस नाईक सविता उंदरे यांचा समावेश होता.
दि. ७ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता पथक आरोपीच्या घराजवळ पोहोचले असता घराचा दरवाजा उघडा होता. चौकशीदरम्यान आरोपी पोलिसांना पाहताच पळून गेला. घरातील महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
“मार इसकु…” चिथावणीखोर घोषणांनंतर कोयत्याने हल्ला
पोलीस कर्मचारी जखमी
आरोपी एका घराच्या कंपाउंडवरून उडी मारून पळून जात असताना पोका किरण मदने यांनी उडी मारून त्याला पकडले. मात्र आरोपीने जोरदार प्रतिकार सुरू केला. या झटापटीदरम्यान गल्लीत सुमारे ३० ते ४० नागरिक जमा झाले.
आरोपीने जमावाला उद्देशून चिथावणीखोर घोषणा करत, “पथर फेको, ये साले पोलीस कुछ नहीं करेंगे” असे म्हणत वातावरण अधिक भडकावले. त्यानंतर ५ ते ७ अनोळखी इसमांनी आरोपीची जबरदस्तीने सुटका करण्याचा प्रयत्न केला.
इतक्यात “शेरू” नावाच्या तरुणाला उद्देशून आरोपीने “मार इसकु” अशी चिथावणी दिल्यानंतर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोका किरण मदने यांच्या डोक्यावर वार केला. वार चुकवताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर
स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार
जमाव अधिकच आक्रमक होत पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलीतून हवेत एक गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज होताच जमाव पांगला.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने आरोपी आयद बाबुलाल सय्यद याला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपी व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
शहरात खळबळ, पुढील तपास सुरू
या प्रकरणी पोलीस हवालदार अजय विलास सरजिने यांच्या फिर्यादीवरून आरोपी आयद बाबुलाल सय्यद व शेरू (पूर्ण नाव अज्ञात) यांच्यासह इतर अनोळखी इसमांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, दंगल, शस्त्राने हल्ला व जीवघेणा प्रतिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button