Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

शिर्डी- राहाता-राहुरी व देवळाली प्रवरा पालिकांची पहिली सभा १३ जानेवारीलाउपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीकडे सर्वांचे लक्ष

राहुरी / राहाता / शिर्डी / देवळाली प्रवरा | प्रतिनिधी
जिल्ह्यातील बारा नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, यासाठी नूतन नगराध्यक्षांकडून पहिल्या सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये श्रीगोंदा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा १२ जानेवारी, तर देवळाली प्रवरा, शिर्डी, राहाता व राहुरी नगरपालिकांची पहिली सभा १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या सभांमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड तसेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.
बारा पालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायत अशा एकूण बारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.
या निवडणुकांमध्ये सर्व नगरपालिकांवर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले असून, आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचा अधिकार नूतन नगराध्यक्षांना आहे.
विविध पालिकांच्या सभेच्या तारखा जाहीर
त्याअनुषंगाने —
🔹 श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुनिता संतोष खेतमाळीस यांनी
➡️ दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
🔹 देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी
➡️ दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
🔹 शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री विष्णू थोरात यांनी
➡️ दि. १३ जानेवारी २०२६ रोजी शिर्डी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
🔹 राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर यांनी
➡️ दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
🔹 राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी देखील
➡️ दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग
या पाचही नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच सभेत सत्ता-संतुलन कसे घडते, यावर आगामी कालावधीतील नगरपालिकेची दिशा ठरणार असल्याने या निवडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button