Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
राजकीयशिर्डी

आता २१ डिसेंबरला ‘ड्राय डे’ मतमोजणी पुढे ढकलल्याने जिल्हाधिकारींचा नवीन आदेश लागू

अहिल्यानगर, दि. २ : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख बदलल्यानंतर जिल्ह्यातील ‘ड्राय डे’ची तारीखही बदलली आहे. ३ डिसेंबरऐवजी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचा सुधारित आदेश जारी केला आहे.

sai nirman
जाहिरात

मतमोजणी पुढे ढकलली; ‘ड्राय डे’ची नवी तारीख निश्चित

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून नवी तारीख २१ डिसेंबर निश्चित झाली आहे. मतमोजणीदरम्यान कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

DN SPORTS

या शहरांमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद

२१ डिसेंबर रोजी खालील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील :
संगमनेर, कोपरगांव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा (नगरपरिषदा) व नेवासा नगरपंचायत.

देशी–विदेशी दारू दुकाने व बीअर बार बंद

या दिवशी—

सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने

kamlakar

बीअर बार
पूर्णपणे बंद राहतील.

घाऊक विक्रेते व उत्पादकांना अटींसह सूट

घाऊक विक्री परवाना असलेले CL-2 / FL-1 परवाना धारक विक्रेते तसेच मद्य उत्पादकांना कार्यरत राहण्यास परवानगी असेल. मात्र, ‘ड्राय डे’ लागू असलेल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा मद्यपुरवठा करण्यास सक्त मनाई असणार आहे.


२१ डिसेंबरला मतमोजणीसोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात कठोर ‘ड्राय डे’ची अंमलबजावणी होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button