Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर-खोटे मतदान उघड! प्रशासनाची तातडीची कारवाई

शिर्डी,दि.२ : शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर श्रीमती शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली.

याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.”

DN SPORTS

निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button