Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
अ.नगरशिर्डी

साईबाबा मंदिरात श्री गुरुपौर्णीमा उत्सवाचे काल्याच्या कीर्तनाने सांगता

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक ०९ जुलै २०२५ पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. सौ. प्राची व्‍यास, बोरीवली यांच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.
आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी ०६.५० वा. संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर सकाळी ७.०० वा. गुरुस्‍थान मंदीर येथे रुद्राभिषेक करण्‍यात आला. सकाळी १०.०० वाजता सुरु झालेल्‍या काल्याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री पारेश्‍वर बाबासाहेब कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम झाला. दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत श्री हिमांशु जुनेजा, सहारणपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती व रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत पद्मश्री मदनसिंह चौहान, रायपुर यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर ,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button