Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
अ.नगरक्राईम

भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची अखेर बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात वाढत चाललेल्या वादामुळे तसेच तपासाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे ही बदली झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गर्भलिंग चाचणी व फसवणूक प्रकरणामुळे वाढला दबाव
अशोक खरात याच्याशी संबंधित गर्भलिंग चाचणी, महिलांवरील अत्याचार तसेच आर्थिक व्यवहारांच्या अनेक गंभीर प्रकरणांमुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणातील तपासावर अनेक सामाजिक संघटना, पत्रकार तसेच नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. काही आरोपींना मिळणाऱ्या कथित संरक्षणावरूनही पोलीस प्रशासनावर टीका होत होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कारवाईसाठी जनतेचा वाढता दबाव
या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी तसेच तपासात ढिलाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. विशेषतः सामाजिक माध्यमांवर आणि विविध निवेदनांमधून जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
बदलीनंतर पोलीस विभागात चर्चांना उधाण
दत्ता कराळे यांच्या बदलीनंतर नाशिक परिक्षेत्रातील पोलीस प्रशासनात मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. आगामी काळात अशोक खरात प्रकरणातील तपास अधिक वेगाने होणार का, तसेच संबंधितांवर आणखी कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदली नाही, थेट निलंबन करा!” — कराळे प्रकरणावर नागरिक आक्रमक
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. खरातच्या कार्यक्रमातील फोटो, व्हिडीओ आणि भाषणामुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.


दमानिया यांनी उपस्थित केलेल्या आरोपांनुसार, आयजी दर्जाचा अधिकारी असताना कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमात उपस्थित का होते? त्यांनी तेथे भाषण का दिले? असा सवाल उपस्थित करण्यात आला. सामान्य नागरिकांमध्ये त्यामुळे खरातविषयी विश्वास निर्माण झाला, अशी टीकाही करण्यात आली.
याशिवाय खरात आणि कराळे यांच्यात तब्बल १८ फोन कॉल झाल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी याबाबत उत्तर द्यावे, असेही दमानिया यांनी म्हटले होते.
दरम्यान, राज्य सरकारने दत्ता कराळे यांची बदली केल्यानंतर दमानिया यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र नागरिकांमधून आता “फक्त बदली नको, तर निलंबन करून चौकशी व्हावी” अशी जोरदार मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button