Letest News
भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा
अ.नगरक्राईम

शिर्डी सह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वाढते अवैध धंदे व त्यामुळे वाढली गुन्हेगारी प्रवृत्ती!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीसह अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शिर्डी तर आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. मात्र येथे अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. हे गेल्या काही दिवसांपूर्वी येथे घडलेल्या घटनांमुळे उघडकीस आले आहे. मात्र तरीही येथे सर्व अलबेल असल्याचे दाखवण्यात येत असून दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती शिर्डी सह परिसरातील गावांमध्ये वाढत आहे. अवैध धंदे वाढत आहेत. याला लगाम कोण घालणार ?असा सवाल आता नागरिकांमधून, साईभक्तांमधून उपस्थित होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर या तीर्थक्षेत्राच्या शहरातील वाढती गुन्हेगारी, खुलेआम सुरू असलेले दोन नंबर धंदे आणि नुकतेच उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करत पोलीस प्रशासनाला ७२ तासांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपण्याआधीच तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची अचानक धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

असा धडाकेबाज निर्णय तेथील पालकमंत्र्यांनी घेतला. शिर्डी तर आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. गेल्या काही दिवसापासून येथे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या संदर्भात चर्चा होत असताना पोलीस प्रशासन व शासन गोरगरिबांच्या घरे, झोपड्या, पाडत आहेत. फुटपाथ वर छोटे छोटे पोटासाठी धंदा करणारे यांच्यावर कारवाई होत आहे. मात्र येथील मोठमोठे हॉटेल, रेस्टॉरंट यांनी मोठे अतिक्रमण केलेले आहे.

त्यांच्यावर कारवाई होत नाही. अनेक अवैध धंदे येथे बिंदास सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे. येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. सध्या दाखवण्यासाठी पोलीस धरपकड मोहीम राबवत असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिर्डी सोडून आसपास गावांमध्ये गेल्याचे बोलले जात आहे. शिर्डी सह परिसरातही अवैध धंदे गुन्हेगारी प्रवृत्ती गुन्हेगारी टोळ्या वाढत आहेत. हाणामारी, मारामाऱ्या, वाहनांची तोडफोड, आदी घटना परिसरातही घडत आहेत.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून होत आहे. या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व अवैध धंदा करणाऱ्या तरुणांना कोणाचे पाठबळ आहे, कोणाच्या जीवावर हे दहशत निर्माण करत आहेत, याचा छडा लावणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष घालून तुळजापूर प्रमाणे शिर्डीत विशेष कडक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. शिर्डी प्रमाणे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे.

मटका ,जुगार वेश्याव्यवसाय, अवैध वाहतूक, अवैध दारू, गांजा, चरस, विक्री, या सर्वांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाटत आहे. मात्र जिल्हा पोलीस प्रशासन सर्व अलबेल असल्याचे दाखवत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जबाबदार धरून त्यांचीच बदली करून येथे जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष असा पोलीस अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी, महिलांनी ,भाविकांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button