Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

जी अब्दुल बाबा समाधी मंदिराची जबाबदारी संस्थांनने घेऊन तेथील देणगीरुपी पैसाही संस्थांनने स्वतःकडे घ्यावा —-राष्ट्रीय श्रीराम संघ

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीतील साई संस्थान परिसरातील हाजी अब्दुल बाबा समाधीची जबाबदारी साई संस्थान ने घेऊन तेथे संस्थांनचे कर्मचारी नियुक्त करावेत व तेथील भाविकांनी दिलेली देणगी ही संस्थांनने घ्यावी. अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश अशोक बेग‌, राष्ट्रीय अध्यक्ष सागर अशोक बेग , भारतीय लहुजी सेनेचे समीर (अण्णा) वीर आदींच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत मागणी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साई संस्थांनला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
शिर्डीत श्री साईबाबा मंदीराचे आवारात श्री साईबाबांचे समकालीन, श्री साईबाबांबरोबर वावरले आणि बाबांची मनोभावे सेवा केलेले परमसाईभक्त नामावली, लक्ष्मीबाई कोते, अब्दुल बावा व इतरांच्या समाध्या आहेत. आणि त्या परंपरागत श्री साईबाबा संस्थानकडे देखभालीकरीला आहे.

तसेच त्यांचे कोणाचेही वारसदार त्यावर हक्क सांगत नाहीत किंवा त्याठिकाणी संस्थान देखभाल करते किंवा संस्थानचे हद्दीत येतात. म्हणून संस्थानकडेच त्याची जबाबदारी व हक्क आहेत.परंतु त्यापैकी हाजीअब्दुलबाबांची समाधीच काही वैयक्तिक इसन्नांकडे देण्यात आलेली आहे. त्यावर येणारा साईभक्तांकडून दान केलेला पैसा हा त्या वैयक्तिक इसमांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे ते त्या हाजी अब्दुलबाबांच्या समाधीवर साईभक्तांनी टाकलेल्या रोख दानावर हक्क प्रस्थापीत करून स्वतःचे खिशात टाकतात.

हे सर्वस्वी चुकीचे आहे. अब्दुल बाबांच्या समाधीवर येणारे सर्व रोख दान हे साईसंस्थानच्या पेटीत/ताब्यातच गेले पाहिजे. व अब्दुल बाबांच्या समाधीची जबाबदारी श्री साईबाबा संस्थानेच घेतली पाहिजे. आपण यामध्ये जातीने लक्ष घालून संबंधित व्यक्तीना अब्दुलबाबांच्या समाधीवरुन बाजुला करून या समाधीवर संस्थानमार्फत कर्मचारी नियुक्त करणेत यावे.लवकरात लवकर कार्यवाही करावी. अन्यथा आम्हाला त्याविरोधात तीव आंदोलन करावे लागेल. असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या वतीने देण्यात आला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button