Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
अ.नगरक्राईम

अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल

शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात वाहनांच्या काचांवर लावलेल्या बेकायदेशीर ब्लॅक फिल्मविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्त धडक मोहीम राबवून तब्बल ४५८ वाहनांवर कारवाई केली असून ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र ही कारवाई पाहून आता “अहिल्यानगरमध्ये कारवाई होतेय, मग शिर्डीत कधी?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🛑 २,०२१ वाहनांची तपासणी; ४५८ दोषी दि. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २,०२१ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.


⚖️ ब्लॅक फिल्म काढून टाकल्या कारवाईदरम्यान दोषी वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स तात्काळ काढून टाकण्यात आल्या. याशिवाय विमा नसलेली वाहने, परवाना नसलेले चालक, नोंदणी प्रमाणपत्र नसलेली वाहने, दिव्यांतील त्रुटी व प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.


❓ शिर्डीत मात्र मोकळे रान? दररोज लाखो भाविक येणाऱ्या शिर्डी शहरात अनेक वाहनांवर सर्रास ब्लॅक फिल्म दिसून येतात, तरीही अद्याप अशी व्यापक धडक मोहीम का राबवली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गर्दी, महिला सुरक्षा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने ब्लॅक फिल्म मोठा धोका ठरत असताना शिर्डीत कारवाईचा अभाव का, अशी चर्चा रंगली आहे.

📢 नागरिकांची मागणी
“जिल्हा मुख्यालयात कारवाई होत असेल, तर साईनगरी शिर्डीतही तात्काळ विशेष मोहीम राबवावी,” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
🚓 प्रशासन लक्ष देणार का? आता अहिल्यानगरप्रमाणेच शिर्डीतही ब्लॅक फिल्मविरोधात कडक कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button