Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

राहाता येथे दारूच्या नशेत दिराने भावजाइचा केला खून आरोपी काही तासात अटक

राहाता प्रतिनिधी दिराने दारूच्या नशेत टनक वस्तूने मारहाण करून भावजईचा खून केल्याची खळबळ जनक घटना राहाता शहरात 15 चारी हद्दीत घडली आहे यात सविता लहानु पवार वय 40 वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे या घटने प्रकरणी राहता पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केले आहे…

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


   
याबाबतची वृत्त असे की राहाता शहरात 15 चारी हद्दीत प्रकाश जगताप यांचे पेरूच्या शेतात आदिवासी समाजाचे हे कुटुंब बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते .पाथर्डी येथील ठेकेदार नारायण सोमनाथ राठोड याने हे कामगार पुरवठादार आहेत दरम्यान शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवार व इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते तद नंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन गोविंद पवार याचे व मयत सविता लहानु पवार या दोघांमध्ये काहीतरी भांडणे झाले असावीत या भांडणामध्ये काहीतरी टनक वस्तूने डोक्यात कानशिलाजवळ मारहाण केल्याने ज्या मारहाणीत सविता हिचा मृत्यू झाला. मयत सविताच्या डोक्यावर कानशिलालगत गंभीर इजा झाल्याने तसेच छातीवर  जखमा झाल्याने त्यात ती मृत पावली ..दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तेथे सविता मृत असल्याचे त्यांना निदर्शनास आले.. आरोपी हा तेथून फरार झालेला होता तर नंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवत आरोपीला काही तासाच्या अटक केली आहे. सविताचा खून नेमका कोणत्या कारणाने केला त्यामागचे इतर कारणे काय याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल.

 शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार यांचे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३८३/२०२४ भारतीय दंड संहिता आ /१ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करीत आहे…

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button