Letest News
कॅनरा बँकेची मोठी देणगी! श्री साईबाबा हॉस्पिटलला ३५ लाखांचे अत्याधुनिक व्हेंटिलेटर — रुग्णसेवेला नवी... भक्तीच्या आडून कोट्यवधींची उलाढाल? कोयटे-खरात कनेक्शनने राज्य हादरलं नाशिकच्या स्टेजवर ‘भोंदू’ प्रमु... “मरणाआधीच नावं लिहून दिली… तरीही न्याय नाही!” — विकास दिवटे प्रकरणात चौकशीवर गंभीर सवाल 🚨 ब्रेकिंग न्यूज | शिर्डीत पेरू विक्रेत्यांचा अचानक रास्तारोको-वाहतुक ठप्प 🚨 सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना...
क्राईमशिर्डी

साई संस्थांनचे सभासद होण्यासाठी खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल शिर्डीतील एका व्यक्ती विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

शिर्डी ( प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानचे सभासद होण्यासाठी आमिष दाखवून सहा हजार रुपये पेटीएम वर घेऊन आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद उत्तर प्रदेशातील नोएडा येथील जोगिंदर सिंह अवाना यांनी अमोल गुजराथी यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नोएडा येथील जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,मी राजस्थान सरकार मध्ये मंत्री व माजी आमदार आहे. मी दरवर्षी साईबाबाच्या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतो. मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. काही दिवसांपुर्वी शिर्डी येथे असतांना माझी नवनाथ घुले, रा. सिन्नर यांचे सोबत ओळख झाली होती,

श्री घुले हे अतिशय प्रामाणिक आहेत. त्याचे ओळखीने माझी अमोल गुजराथी, रा शिर्डी यांची व माझी ओळख झाली होती. गुजराथी याचा मोबाईल क्रमांक 7264807305 असा होता. गुजराथी याने मला दि. 13/12/2024 रोजी व्हाटस अँपवर मैसेज केला की, जय साईनाथ, अमोल गुजराथी, शिडी साईबाबा संस्थान. त्यानंतर त्याने मला मॅसेजवर सांगितले की, आप शिरडी संस्थान में सभासद हो जाओ. मैं आपको फॉर्म भेजता हु,

साईबाबा संस्थान मध्ये प्रत्येक राज्यातून एक मेंबर घेण्यात येणारे आहे. तर तुम्ही सभासद व्हा, असे मला मॅसेजवर सांगितले. मला साईबाबांवर श्रध्दा असल्याने मी त्यास होकार दिला. म्हणून त्याने मला एक इंग्लीश भाषेत फॉर्म पाठवला व एका सभासदानी 3000/- रू असे त्यांनी मला सांगितले. मला वाटले की, साईबाबा संस्थानचा अधिकृत व्यक्ती असल्याने तसेच मी वेळोवेळी दर्शनासाठी आल्यावर भेटत असलयाने मी त्यांचेवर विश्वास ठेवला.

अमोल गुजराथी याने मला पाठवलेला फॉर्म माझा व माझा मुलगा हिमांशु चौधरी असे दोघांचे नावे भरून दिले व सोबत आधारकार्ड देखील पाठवले. त्यानंतर 17/12/2024 रोजी माझा मुलगा हिमांशू ने अमोल गुजराथी दिलेला मोबाईल क्रमांक 9212130130 यावर पेटीम ने 6000/- रू ऑनलाईन पाठवले. त्यानंतर मी पैसे दिल्याची पावतीची मागणी केली असता तो नेहमीच टाळाटाळ करत असे. त्यानंतर मी त्याला बरेच दिवस पावतीची मागणी केली परंतु अद्याप पावेतो मला पावती पाठविली नाही.


त्यानंतर वेळोवेळी अमोल गुजराथी यास फोन केला असता त्यांचा फोन बंद केला असल्याने संपर्क होवू शकला नाही. मी शिर्डी येथे आज साईबाबांचे दर्शनाकरीता आलो असता, आम्ही श्री साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी श्री रोहिदास माळी यांना घडलेला प्रकार सांगितला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, श्री साईबाबा संस्थान ने सहा हजार रू .भरून सभासद व्हायची अशी कोणतीही योजना नाही. त्यावेळी माझी खात्री झाली की, अमोल गुजराथी याने श्री साईबाबा संस्थानचे सभासद करून देतो असे सांगून श्री साईबाबा संस्थानचे सभासद आमिष दाखवुन आमचे कडून

आधार कार्ड व फॉर्म भरून सहा हजार रू पेटीम वर घेवून आपली आर्थिक फसवणूक केली आहे. अशा आशयाची फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात अमोल गुजराथी याच्या विरोधात दिली आहे. या फिर्यादी वरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 340 /2025 नुसार भारतीय न्याय संहिता 318 ( 4) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button