Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
क्राईमशिर्डी

पॉलिसी करत असलेल्या तरुणाचा जीवघेणा हल्ला-विश्वास माघाडेवर गुन्हा दाखल

शिर्डी | प्रतिनिधी
साई समाधी मंदिर परिसरात कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात पोलिसी करत असलेल्या एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील विश्वास दादासाहेब माघाडे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १६ जानेवारी रोजी दिलीप बोधक (रा. शिंगवे) हे शिर्डीत राहणाऱ्या आपल्या बहिणीकडून घरी जात असताना साई समाधी मंदिर गेट क्रमांक ७ जवळ अचानक आरोपी विश्वास माघाडे याने त्यांना अडवले. कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत धमकावून आरोपीने हातातील चाकूने बोधक यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार केला.
हल्ल्याची तीव्रता इतकी होती की परिसरात एकच गोंधळ उडाला. आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून येताच आरोपीने प्रसंगाचा फायदा घेत स्कूटरवरून घटनास्थळावरून पलायन केले.
जखमी अवस्थेतही धैर्य दाखवत दिलीप बोधक यांनी थेट शिर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी विश्वास माघाडे याच्यावर
➡️ तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून जखमी करणे,
➡️ जीव मारण्याची धमकी देणे,
➡️ धमकावणे,
➡️ सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात शिवीगाळ करून दहशत निर्माण करणे
या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण करत असून, मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
❗ साई मंदिर परिसरात वाढते गुन्हे — पोलिसी बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह
❗ भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी
— साईदर्शन न्यूज

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button