Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
क्राईमशिर्डी

सावधान! घरगुती गॅस हॉटेलमध्ये वापरल्यास कारवाई शिर्डीत ५ ठिकाणी धाड

शिर्डी | प्रतिनिधी
आखातात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅस पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असताना प्रशासनाला गॅस वितरणाची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांच्या घरगुती गॅसवर डल्ला मारणाऱ्या शिर्डीतील काही हॉटेल व्यावसायिकांवर राहाता तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत पाच ठिकाणांहून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्यात सध्या गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची चूल पेटते की नाही, हा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा वेळी काही व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल व्यवसायासाठी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा तसेच घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहाता तहसील कार्यालयाकडून पुरवठा निरीक्षक अधिकारी स्नेहल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.


या पथकाने शिर्डीतील नगर–मनमाड रोड तसेच कोते गल्ली परिसरात धडक मोहीम राबवली. तपासणीदरम्यान पाच ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये पुना टी हाऊस (कोते गल्ली), हॉटेल नंदादीप, पंजाबी ढाबा (नगर–मनमाड रोड), सदगुरु ढाबा (कोते गल्ली) आणि चंद्रकला कोते यांचे चहाचे दुकान या आस्थापनांचा समावेश आहे.


पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणांवरील घरगुती सिलेंडर जप्त केले. जप्त केलेले सिलेंडर साई गणेश गॅस एजन्सी येथे जमा करण्यात आले असून संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसची वाटमारी करणाऱ्यांविरोधात तहसील प्रशासन कोणती कठोर कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


इशारा : घरगुती गॅसचा गैरवापर महागात पडणार
घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल, ढाबा किंवा व्यावसायिक कारणासाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे. अशा प्रकारची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिल्यास तातडीने धडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button