Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
क्राईमशिर्डी

‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा

शिर्डी : शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना धमकावण्याची भाषा वापरली जात असेल, तर ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. मंत्र्यांच्या मुलाने जाहीर सभेत विरोधकांचा ‘बंदोबस्त’ करण्याची भाषा केल्याचा दावा करत, “मंत्रीपद जनतेची सेवा करण्यासाठी आहे; गुंडगिरीची भाषा करण्यासाठी नाही,” असा थेट इशाराच पिपाडा यांनी दिला आहे.
शिर्डी–अहिल्यानगर मार्गाची दुरवस्था, जीवघेणे खड्डे, निकृष्ट काम आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याबाबत आपण सातत्याने तक्रारी करून आवाज उठवत आहोत. मात्र, जनतेच्या प्रश्नांवर बोलल्यामुळेच जर सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून ‘बंदोबस्त’ करण्याची भाषा केली जात असेल, तर सत्याचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे डॉ. पिपाडा यांनी म्हटले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘विरोधकांना नेपाळमध्ये पाठवा’ वक्तव्यावर संताप
नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवरही संवेदनशीलता अपेक्षित असताना, संबंधित मंत्र्यांच्या मुलाने जाहीर सभेत विरोधकांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा पिपाडा यांनी केला आहे. “काही लोकांना नेपाळमध्ये पाठवा, त्यांना परत आणू नका,” अशा आशयाची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला.
“हजारो लोक पुराच्या संकटात सापडले असताना अशा प्रकारची भाषा वापरणे ही संवेदनशीलतेची परिसीमा आहे. विरोधक असतील म्हणून त्यांच्याबद्दल एवढी द्वेषाची भावना का?” असा सवालही पिपाडा यांनी उपस्थित केला.


‘वडील मंत्री आहेत म्हणून कोणाचे काही वाकडे करू शकत नाही’ हा भ्रम धोकादायक
मंत्रीपद हे जनतेने दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता दिली आहे; विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा गुंडगिरीची भाषा करण्यासाठी नाही, असे पिपाडा यांनी सुनावले.
“वडील मंत्री आहेत म्हणून आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही,” अशी मानसिकता सत्तेत असलेल्या कुणाच्याही अंगी बाणणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा
सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी गुंडांना हाताशी धरल्याचा आरोप करत, हा प्रकार थांबविण्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांची आहे, असेही डॉ. पिपाडा यांनी स्पष्ट केले.
“मंत्र्यांनी आपल्या मुलाला आवर घालावा. सत्ता कायमची नसते; जनतेचा दरबार सर्वांत मोठा असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेचे हाल होत असताना प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावण्याऐवजी रस्ते दुरुस्त करा,” असा घणाघात पिपाडा यांनी केला.
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून हे आरोप करण्यात आले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button