Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
Blog

वेगवेगळे कारणे दाखवून ग्राहक, व ओळखीच्या लोकांकडून रोख रक्कम व सोने, घेऊन सुमारे 36 लाख 35 हजार रुपयांची केली फसवणूक!

शिर्डी( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील एका सराफने ग्राहक व ओळखीच्या लोकांकडून दागिने बनवण्यासाठी घेतलेली रक्कम तसेच त्यांचे दागिने घेऊन फसवणूक करत पोबरा केल्यामुळे राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या सराफा विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द येथील सविता शंकर विटनोर या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,
संतोष भाउसाहेब लोळगे धंदा. सराफी व्यवसाय राहणार- दत्तनगर बेलापुर रोड कोल्हार बु/ता. राहाता जिल्हा. अहिल्यानगर याचेशी आमची ओळख सुमारे 15 वर्षापासुन होती. आमचे आर्थिक देण्या घेण्याचे व्यवहार होते.

संतोष भाउसाहेब लोळगे व त्याची पत्नी श्वेता संतोष लोळगे हे दोघे नोव्हेबर 2023 मध्ये माझेकडे आले व मला म्हणाले की, मला पैश्याची खुप अडचण आहे मी तुम्हांला चार सोन्याचे मोठे डाग बनवुन देतो. आता तुम्ही मला तुमच्याकडील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे मिळुन 8,50,000/- रुपये दया .असे मला म्हणाल्याने मला पण 4 मोठे डाग 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने करण्याचे असल्याने मी त्यांच्यावर विश्वास ठेवून माझे कडील 12 तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम 1,50,000/-रुपये असे एकूण 8,50,000/-रुपये दिले त्यानंतर बरेच दिवस झाले त्याने मला मी त्याच्याकडे करण्यास दिलेले सोन्याचे दागीने दिले नाही.

म्हणुन मी त्यांच्या घरी वेळोवेळी जावुन त्यांना सांगीतले की, तुम्ही माझे सोन्याचे दागीने व रोख रक्कम परत द्या. त्यानंतर त्याने मला दिनांक 30.1.2024 रोजी महेंद्र कोटक बँक शाखा कोल्हार यांचा 4,00,000/- रु. रकमेचा चेक दिला त्यानंतर मी सदर चेक बँकेत टाकला असता सदरचा चेक सदर इसमाचे बँकेत त्याच्या खात्यावर पैसे नसल्याने तो चेक न वटता परत आला.

त्यानंतर मी पुन्हा सदरचा चेक हा दिनांक 5.4.2024 रोजी बँकेत घेवुन गेले असता परत सदरचा चेक पुन्हा बाऊन्स झाला. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. आमचे 1,50,000/-रु.रोख रक्कम व 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने हे संतोष लोळगे व त्याची पत्नी श्वेता संतोष लोळगे दोन्ही रा कोल्हार बु/तालुका. राहाता यांना 4 मोठे डाग करण्या करीता दिले होते व रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये रोख असे एकूण 8,50,000/-रु. असे संतोष लोळगे व त्याची पत्नी श्वेता लोळगे यांना दिले होते

परंतु त्यांनी माझे 4 सोन्याचे डाग बनवुन दिले नाही व रोख पैसे परत दिले नाही मी त्यांच्याकडे वेळोवेळी पैश्याची व सोन्याचे दागीण्यांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तो आता कुठेतरी बाहेरगावी राहत आहे .तो सध्या पुणे खडकी येथे राहण्यास आहे असे मला समजले. तसेच माझ्यासह इतर एकनाथ सोपान गवळी यांचेही पाच तोळे वजनाचे दागीने व 20,000/- रु रोख रक्कम देखील घेवुन गेला आहे.

तसेच माझे ओळखीचे
सागर भाउसाहेब थोरात राहणार. कुरणपुर तालुका श्रीरामपुर याचेकडुन देखील रोख व फोन पे व्दारे व 4 तोळे सोन्याचे दागीने असे एकुण 5,50,000/- तसेच बबन दगडु पारखे राहणार. कुरणपुर यांच्याकडुन फोन पे व रोख स्वरुपात असे सुमारे 10,00,000/-रुपये तसेच शहारुख बाबामियों शेख राह. कोल्हार तालुका. राहाता जिल्हा. अहिल्यानगर

यांचे 1,60,000/-रु. कि.चे सोन्याचे दागीने बनवीण्यासाठी पैसे घेवुन त्याची फसवणुक केली आहे. तसेच समीर शेख रा कोल्हार बु// ता. राहाता याचे सुध्दा 2,70,000/-रुपये किंमतीची तसेच शोभा लोखंडे हीचे कडुन 55,000/-रु कि.ची फसवणुक केली आहे. तसेच लोणी येथे राहणार रविंद्र जनार्धन माळवे यांचे कडुन देखील सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने धंदयासाठी संतोष भाउसाहेब लोळगे व त्यांचे भाउ सचिन भाउसाहेब लोळगे राहणार राहाता यांना कोल्हार येथे त्यांचे दुकानावर दिले असल्याचे मला समजले आहे तसेच इतर लोकांचीदेखील अशा प्रकारे फसवणुक केल्याचे मला समजले आहे.


माझे व इतरांचे एकुण 36,35,000/-रुपये आम्हां सर्वांची फसवणुक त्यांनी केली आहे . त्यामुळे संतोष भाऊसाहेब लोळगे श्वेता संतोष लोळगे सचिन भाऊसाहेब लोळगे बागुल ज्वेलर्स राहता यांच्या विरोधात फिर्याद त्यांनी दाखल केले आहे‌ या फिर्यादीनुसार लोणी पोलीस स्टेशन येथे 241 /2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम 34 ( 2 )420 ( 3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button