शिर्डी (विशेष प्रतिनिधी) —
पायातील साध्या फोडावर उपचार घ्यायला गेलेल्या माणसाला शेवटी पाय गमवावा लागतो की काय असा दुर्दैवी प्रसंग एका गरीब कुटुंबावर ओढावला आहे
हे वाचून अविश्वास वाटेल, पण हे सत्य आहे — आणि तो पाय नाहीसा करणारा डॉक्टर पाच गावात प्रसिद्ध आहे
निमगाव कोराळे येथील रुग्ण काही दिवसांपूर्वी सावळीविहिर येथे डॉक्टराकडे औषधोपचारासाठी गेला होता
या डॉक्टराने रुग्णाला कमरेजवळ इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाला तीव्र रिअॅक्शन आली. काही तासांतच मांडी आणि कंबरजवळील भाग सेप्टिक होऊन काळवंडला. नातेवाईकांनी गडबड लक्षात आणून दिली, तर हा डॉक्टर म्हणाला — “घाबरू नका, मी आहे ना! परत उपचार केले
दुसरीकडे कुठे जाऊ नका असं सल्ला देण्यास देखील तू विसरला नाही आणि इथेच खरी संकटाची सुरुवात झाली या आत्मविश्वासानेच रुग्णाची होरपळ झाली . काही दिवसांतच पाय सडू लागला आणि अखेर परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पाय वाचवण्यासाठी लाखोंचा खर्च डॉक्टरलाच करावा लागला!
रुग्णाला नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे सुरुवातीचा खर्च या डॉक्टराने केला, पण काही दिवसांनी तोच डॉक्टर म्हणाला — “आता माझं काही देणंघेणं नाही, तुम्ही बघा तुमचं!”
रुग्णाच्या घरच्यांनी शेवटी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू ठेवले.आता तो रुग्ण जिव वाचवण्यासाठी झुंजतोय आणि डॉक्टर मात्र मोकळेपणाने गावात फिरतोय! मध्यस्थांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, पण प्रश्न असा आहे की —कर्त्याचा पाय गेला, तर जबाबदार कोण?”
पोलीसही शांत, प्रशासनही गप्प आणि गावकऱ्यांत मात्र संतापाचा उद्रेक दिसून येतो आता हा उद्रेक थांबतो की मोठ्या प्रमाणावर वाढतो याकडे काही चळवळीतील कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष आहे
रुग्णाचा पाय सडला, डॉक्टर म्हणतो — माझा दोष नाही
काही अजी-माजी लोकप्रतिनिधीची डॉक्टरसाठी मध्यस्थी?
सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असताना, काही आजी-माजी लोकनियुक्त मंडळी या वादग्रस्त डॉक्टरच्या बचावासाठी पुढे सरसावल्याची चर्चा रंगली आहे.
तक्रार देऊ नये, “आपण बघतो” अशा आश्वासनांनी पीडित कुटुंबावर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे
