Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

प्रभाग क्र. ०२ मधील विकासकामांसाठी भावी उपनगराध्यक्ष नगरसेवक सतीश गोंदकर आक्रमक-मुख्याधिकाऱ्यांना धडक निवेदन

शिर्डी | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
शिर्डी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ०२ मधील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे व सार्वजनिक सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागातील विविध प्रलंबित व अत्यावश्यक विकासकामे तातडीने हाती घेण्याची मागणी नगरसेवक सतीश ऊर्फ नंदूभाऊ गोविंदराव गोंदकर यांनी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील दळणवळण सुलभ व्हावे, स्वच्छता टिकून राहावी तसेच नागरिकांची सुरक्षितता वाढावी, यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, रुंदीकरण, पथदिवे व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
रस्ते विकासासाठी ठोस मागण्या
महालक्ष्मी मंदिर ते संकलेचा, वोस्तवाल कॉलनी मुख्य रस्ता रिंग रोडपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे, ओम साई नगरमधील फुटलेला काँक्रीट रस्ता नवीन टेंडरद्वारे दुरुस्त करणे, पिंपळवाडी रोडचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण, अयोध्यानगर–पिंपळवाडी रस्ता, रतीलाल लोढा यांच्यासमोरील रस्ता तातडीने खुला करणे, तसेच शिर्डी–पिंपळवाडी रोड रुई शिवेपर्यंत १५ मीटर रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.


यासोबतच सर्व्हे नं. ५२ मधील २४ मीटर डी.पी. रस्त्याचे भूसंपादन करावे, तसेच काही भागांत डांबरीकरण, झुडपे काढून रस्ते मोकळे करण्याची गरजही निवेदनात नमूद आहे.
पथदिवे व विद्युत व्यवस्थेवर भर
माऊली नगर, शिंदे-शेळके वस्ती, इनामवाडी, दत्तनगर, अशोक तुपे यांची गल्ली, अमोल गोंदकर यांच्या शेजारील गल्ली आदी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट बसविणे, जुने विजेचे खांब बदलणे, हायमास्ट दिवे उभारणे तसेच दोन पोलमधील अंतर कमी करून नवीन पोल बसविण्याची मागणी नगरसेवक गोंदकर यांनी केली आहे.


गार्डन, वृंदावन व सार्वजनिक सुविधा
सिल्व्हर ओक प्लॅटिनम परिसरातील गार्डन विकसित करणे, दत्तनगर ते इनामवाडी परिसरात श्रीराम नगरप्रमाणे वृंदावन विकसित करून झाडे व ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसविणे, तसेच बंद अवस्थेतील सोलर स्ट्रीट लाईट कार्यान्वित करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या हितासाठी तातडीची कारवाई अपेक्षित


वरील सर्व कामे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असून, ती लवकरात लवकर पूर्ण झाल्यास प्रभागातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे नगरसेवक सतीश गोंदकर यांनी नमूद केले आहे. संबंधित कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button