Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
Blog

वादग्रस्त कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांची त्वरीत बदली व्हावी

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साई संस्थान मध्ये त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली असून या समितीला कुठलाही धोरणात्मक निर्णय
घेण्याचा अधिकार नसल्याने श्री साईबाबा संस्थानचा कारभार ठप्प झालेला आहे. त्यामुळे शिर्डी शहरातील विकास
कामांना खिळ बसली आहे. याकरीता श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाची लवकरात लवकर नेमणूक
करावी तसेच नवीन विश्वस्त मंडळात स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्या देण्यात यावे,व संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा उपविभागीय अधिकारी असावा, अशी मागणी शिर्डीच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी चे विश्वस्त मंडळाची लवकरात लवकर नेमणूक करण्यात यावी. कारण यापूर्वी
श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ एका याचीकाकर्त्यामुळे मा.उच्च न्यायालयाने बरखास्त करुन जिल्हान्यायाधिश-वर्ग-2, मा. जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त
व्यवस्था, शिर्डी यांची त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केलेली आहे. या समितीला कुठलाही धोरणात्मक निर्णय
घेण्याचा अधिकार नसल्याने श्री साईबाबा संस्थानचा कारभार ठप्प झालेला आहे. त्यामुळे शिर्डी शहरातील विकास
कामांना खिळ बसली आहे. याकरीता श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाची लवकरात लवकर नेमणूक
करावी तसेच नवीन विश्वस्त मंडळात स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे .
त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथे IAS दर्जाचा अधिकारी हा याचिका कर्ते यांनी मागणीनुसार
मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने नेमणूक झालेली आहे. मात्र IAS दर्जाचे अधिका-याची या ठिकाणी आवश्यकता नाही. या ठिकाणी IAS दर्जाचा अधिकारी ऐवजी उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करणेसाठी न्याय विधी विभागाने मे.सर्वोच्च न्यायालयात स्वतःहून हजर होणे आवश्यक आहे. जेणेकरुन IAS दर्जाचा
अधिकारी यांची नेमणूक रद्द करता येईल. असे म्हटले असून
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथे सध्या नेमणूक असलेले वादग्रस्त कार्यकारी अधिकारी पी.
शिवा शंकर यांची त्वरीत बदली व्हावी.IAS अधिकारी जिल्हयाचा कारभार पहात असतात. त्यांना मोठा कार्यभार पहाण्याचा अनुभव असतो

kamlakar

.मात्र
शिर्डी संस्थान येथे काम करतांना त्यांची कुचंबना होते. त्यामुळे ते येथे काम करण्यास इच्छुक नसतात. तसेच श्री
साईबाबा संस्थान अतिशय छोटे असल्या कारणाने येथे श्री साईभक्तांचे तसेच शिर्डीतील नागरीकांचे हिताचे निर्णय
घेणारा उपविभागीय अधिकारी दर्जाचा अधिकारीही हे काम पाहू शकतात. याबाबत आपण गांभीर्याने निर्णय घ्यावा.
शिर्डी शहर विकास आराखडा अंतिम मंजूरीकरीता आपले कार्यालयाकडे प्रलंबीत आहे. सदर आराखडा
लवकरात लवकर मंजूर करणेत यावा.शिर्डी शहरातील विकास योजनेतील बरेचशे रस्ते करणे बाकी आहे. शिर्डी शहराची वाढती लोकसंख्या तसेच श्री
साईबाबांचे दर्शनासाठी येणा-या वाढत्या साईभक्तांची गर्दी लक्षात घेता शिर्डी नगरपरिषद हद्दीतील विकासकामांकरीता श्री साईबाबा संस्थानने शिर्डी नगरपरिषदेस निधी देण्याची तरतूद आहे. मात्र श्री साईबाबा संस्थान
त्रिसदस्यीय समिती त्यानुसार कार्यवाही करत नसल्याने शिर्डी शहरातील विकास कामे ठप्प झालेली आहे. श्री
साईबाबा संस्थानने विकास योजनेतील उर्वरीत रस्ते भूसंपादन करुन विकसीत करणेसाठी शिर्डी नगरपरिषदेस भरीवनिधी देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी. अशी मागणी शिर्डीतील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित दादा पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही पाठवण्यात आले आहेत. या निवेदनावर शिर्डी ग्रामस्थांच्या नावे व सह्या आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button