Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका!

शिर्डी |
उपसंपादक राजकुमार गडकरी:

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची अडवणूक करून त्यांना विशिष्ट प्रसादाच्या दुकानात जाण्यास भाग पाडणाऱ्या तिघांविरुद्ध शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 126(2) व 223 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंदिर परिसरातील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 10.45 वाजता शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंदिर परिसरात गस्त घालत असताना गेट क्रमांक 2 परिसरात काहीजण पायी जाणाऱ्या भाविकांचा रस्ता अडवून त्यांना, “आम्ही तुम्हाला साईबाबांचे दर्शन करून देतो, आम्ही सांगतो त्या दुकानातूनच प्रसाद घ्या,” असे सांगून दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सुरेश गंगाधर शेजवळ (वय 50), पांडुरंग रंगनाथ गिरी (वय 35) आणि विश्वनाथ प्रभाकर मरसाळे (वय 32) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संबंधित फुलहार व प्रसाद दुकानासाठी मध्यस्थी करत असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

DN SPORTS

kamlakar


तपासात असेही समोर आले की, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी यांनी यापूर्वीच आदेश काढून मंदिर परिसर व शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर भाविकांना अडवणे, दिशाभूल करणे, विशिष्ट दुकान, हॉटेल किंवा निवासस्थानी पाठविण्यासाठी मध्यस्थी करणे यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भाविकांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्राची प्रतिमा जपण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, मंदिर परिसरात अशा प्रकारे भाविकांना अडवून व्यवसायाकडे वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.


: पोलिसांचा स्पष्ट संदेश
“भाविकांना अडवणे, दिशाभूल करणे, विशिष्ट दुकानात जाण्यास भाग पाडणे किंवा मध्यस्थी करणे हा गंभीर प्रकार असून, अशा कृत्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button