Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
क्राईमशिर्डी

रुई येथे तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! परिसरात हळहळ!

शिर्डी( प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

राहाता तालुक्यातील रुई येथे एका तरुणांने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात असून या घटनेमुळे रुई व परिसरात मोठे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही आत्महत्या की घातपात आहे त्याचीही कुजबुज  सध्या परिसरात सुरू आहे. पण या मृत व्यक्तीच्या जवळ चिट्ठी सापडली असून या चिट्ठीमुळे सर्व काही घटनेचा उलगडा होणार आहे. मात्र सध्या तरी या घटनेमुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

DN SPORTS

kamlakar

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील रुई येथील विकास शिवाजी वाकचौरे( वय 35 वर्ष) हा दिनांक 20 मे 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता घरातून निघून गेलेला होता. त्याचा शोध सर्व कुटुंबीय घेत होते. शिर्डी पोलीस स्टेशनला तसा मिसिंग गुन्हा दाखल झाला होता.

मात्र आज गुरुवार 22 मे 2025 रोजी येथील एका विहिरीत या विकास शिवाजी वाकचौरे तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने आत्महत्या केली असावी अशीही चर्चा होत आहे. त्याच्या जवळ एक चिठ्ठी आढळली असल्याची चर्चा आहे. या चिठ्ठीवरून सर्व उलगडा होणार आहे. मात्र रुई व परिसरात सध्या मयत विकास शिवाजी वाकचौरे यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते व सावकाराच्या जाचा मुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

मात्र खरे काय आहे हे सर्व तपासांअंती स्पष्ट होणार आहे. जर तसे तपासाअंती सिद्ध झाले तर संबंधित सावकार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले असा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी ही चर्चा आहे.सध्या तरी या घटने संदर्भात रुई व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.विकास हा मनमिळाऊ स्वभावाचा होता सर्वांशी त्याचे बोलणे वागणे चांगले होते अश्या मुलाच्या अश्याप्रकारे आपल्यातून जाणे अत्यंत दुःखद आहे असे परिसरातील नागरिक बोलत आहेत

शिर्डी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला असून शवविच्छेदन होऊन  अंत्यविधी करण्यात आला आहे. मात्र या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे शिर्डी रुई परिसरात उलट सुलट चर्चा सध्या सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button