Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचे शिर्डीत साईदर्शन-संस्थानकडून भव्य सत्कार

शिर्डी : नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. साई समाधी मंदिरात प्रवेश करताच त्यांनी साईंच्या चरणी नतमस्तक होत देशातील सुख-शांती, विकास आणि जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी संस्थानच्या कामकाजाबाबत तसेच साई भक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत थोडक्यात माहितीही देण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


खासदार वाघमारे यांनी साईबाबांप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत, “शिर्डी हे देशातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे येऊन आत्मिक समाधान मिळते. साईंच्या आशीर्वादाने जनसेवा अधिक प्रभावीपणे करता येईल,” असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेनेचे बुलंदतोफ जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील, अनिल पवार, राहुल गोंदकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी खासदार वाघमारे यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांच्या भेटीमुळे साईनगरीत राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसैनिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button