Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

भरत मोरे यांच्या त्या” वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध !

कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल २९ जणांकडून ४६ लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा आरोपी शिवमदास बाबत बोलताना व विविध स्थानिक वृत्त वाहिन्यांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी वकीलांबाबद वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा व स्थानिक वृत्त वाहिन्यांचा कोपरगाव वकील संघाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात निषेध व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल २९ जणांकडून ४६ लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा आरोपी शिवमदास याला शहर पोलिसांनी तब्बल वर्षभराने अटक केली होती तर

यातील अन्य आरोपी फरार झाला असताना याबाबत प्लॉट धारकांनी शहर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्यावेळी प्लॉट धारकांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेचे पदाधिकारी भरत मोरे हे ही हजर होते.त्यावेळी त्यांनी स्थानिक वृत्त वहिनी ‘एस.२४ तास’ युट्यूब चॅनलला प्रतिक्रिया देताना,

“खरंतर आरोपी शिवमदास पेक्षा व सर्च रिपोर्ट काढणाऱ्या “…त्या” हरामखोर वकिलाला पोलिस प्रशासनाने अटक केली पाहिजे” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते असा कोपरगाव वकील संघाचा आरोप आहे.त्यामुळे त्यांनी या वक्तव्याचा व प्रसारित केलेल्या वृताचा एक प्रसिध्दी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.

या शब्दाने राज्यातील सर्व वकिलांच्या भावना दुखावल्या आहेत.याबाबत वकील संघ कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

याबाबत निवेदनाच्या प्रती त्यांनीं महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष,कोपरगाव तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदीसह एस.२४ तास संपादक यांना निवेदन पाठवली असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button