Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य,तर आव्हाडांच्या घरापुढे आंदोलन

शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलंय. “राम शाकाहारी नव्हते, तर ते मांसाहारी होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात होते, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असा प्रश्न त्यांनी शिबिरात उपस्थित केलाय. त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शिर्डीत दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “राम शाकाहारी नव्हते, तर ते मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्षे वनवासात घालवली. मग ते शाकाहारी कसे असतील?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करणारे, खाणारे राम आमचे आहेत. राम बहुजनांचे आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.दुसरीकडे ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राम मांसाहारी होता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर ठाण्यात अजितदादा गट आक्रमक झाला. रामाचा फोटो हातात घेत जय श्रीरामच्या घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला. तर जितेंद्र आव्हाड यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावरच आंदोलकांना अडवून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर देखील जितेंद्र आव्हाड समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हातात बांगडी भरल्याप्रमाणे कोपऱ्यावर आंदोलन केलं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार म्हणालेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button